शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

महाबळेश्वरची पेपर बॅग संकल्पना स्तुत्य मनीषा म्हैसकर ; स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत शहराची पाहणी; नागरिकांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:54 IST

महाबळेश्वर : ‘महाबळेश्वरची सर्वात स्वच्छ पर्यटनस्थळ अशी देशभरात ओळख व्हावी, अशा रितीने पालिकेचे प्रयत्न सुरू आहे. नगरपरिषदेची पेपर बॅग ही संकल्पना स्तुत्य असून

महाबळेश्वर : ‘महाबळेश्वरची सर्वात स्वच्छ पर्यटनस्थळ अशी देशभरात ओळख व्हावी, अशा रितीने पालिकेचे प्रयत्न सुरू आहे. नगरपरिषदेची पेपर बॅग ही संकल्पना स्तुत्य असून, बचतगटाच्या माध्यमातून गरजू महिलांना रोजगार देखील मिळत आहे. पर्यावरणपूरक अशी पेपर बॅग ही संकल्पना सर्वच शहरांनी राबवावी,’ असे प्रतिपादन राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी व्यक्त केले.

महाबळेश्वर नगरपरिषदेच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ च्या पाहणी प्रसंगीवेळी त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, नगरविकासचे अप्पर सचिव सुधाकर बोबडे आदी मान्यवर उपस्थित होते.म्हैसकर म्हणाल्या, ‘आत्मविश्वास चांगलं असतो; पण अतिआत्मविश्वास घातक ठरतो. भारतातील आपली स्पर्धा अधिक कठीण आहे. मागील सर्वेक्षणावेळी सर्वाधिक स्वच्छ राज्ये म्हणून गुजरात व मध्यप्रदेश ही पुढे आली होती. देशात महाराष्ट्राची स्पर्धा खºया अर्थाने गुजरात व मध्यप्रदेशशीच असून, मुख्यमंत्र्यांच्या संवादाने आपली शहरे प्रेरित झाली आहेत. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणसाठी आता स्पर्धा आपापल्यात सुरू झाली आहे.

यावेळी म्हैसकर यांनी पालिकेच्या ‘कार्यक्रम अंमलबजावणी कक्षास’ भेट दिली. याठिकाणी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’साठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी चित्रफितीच्या माध्यमातून दिली. यानंतर त्यांनी शहरात विविध ठिकाणांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. यानंतर पालिकेमध्ये नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्या हस्ते मनीषा म्हैसकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपनगराध्यक्ष अफजल सुतार, माजी नगराध्यक्ष किसन शिंदे, नगरसेवक कुमार शिंदे, संदीप साळुंखे, रवींद्र कुंभारदरे, संजय पिसाळ, प्रांतधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार रमेश शेंडगे, संजय जंगम, विशाल तोष्णीवाल, संदीप आखाडे, आबाजी ढोबळे आदी उपस्थित होते.मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी व नगराध्यक्षा शिंदे यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये पालिकेने राज्यातच नव्हे तर देशपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माणकेली असून, पालिका देशातअव्वल ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष शहराकडे..स्वच्छ सर्वेक्षणासाठी महाबळेश्वर पालिकेचे काम खूप चांगल्या पद्धतीने सुरू असून, सिटीझन फिडबॅक वाढविणे गरजेचे आहे. आपण कुठे कमी पडतो? याकडे लक्ष द्या. मुख्यमंत्र्यांचे लक्ष महाबळेश्वराकडे आहे, स्वच्छ सर्वेक्षण आपल्या कामाची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार आहेत. जोमाने प्रयत्न करा,’ असे सांगून म्हैसकर यांनी पालिकेला शुभेच्छा दिल्या.महाबळेश्वर पालिकेच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत’ केलेल्या विविध कामांची बुधवारी राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी अधिकाºयांसमवेत पाहणी केली.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSatara areaसातारा परिसरGovernmentसरकार